TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


कार्तिकच्या भूल भुलैय्या-2 ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच


अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा भूल भुलैय्या-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ चार दिवासांमध्ये या चित्रपटानं 60 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. आता 11 दिवसांमध्ये या चित्रपटानं 128.24 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 150 कोटींचा टप्पा गाठेल असं म्हटलं जात आहे. 


कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; रिलीजआधीच केली 200 कोटींची कमाई


सध्या सिनेमागृहात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. 'वलिमै', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' या सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच गल्ला जमवला आहे. आता कमल हासनचा 'विक्रम' सिनेमा रिलीजआधीच चर्चेत आला आहे. या सिनेमाने रिलीजआधीच 204 कोटींची कमाई केली आहे. 


अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'शेर शिवराज' प्रदर्शित


 'शेर शिवराज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 


'सत्यवान सावित्री' नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला


'सत्यवान सावित्री' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी सावित्रीचे पात्र साकारणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 12 जून पासून ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


ब्रम्हास्त्रचा जबरदस्त टीझर रिलीज


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता  रणबीर कपूर यांच्या  ब्रह्मास्त्र या चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 15 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पण नुकताच या चित्रपटाचा एक खास टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये चित्रपटामधील कलाकारांची झलक दिसत आहे.  


यशचा 'केजीएफ 2' ओटीटीवरील प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 3 जूनला होणार प्रदर्शित


दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा 'केजीएफ 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 400 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे.  सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. 3 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला अनंतात विलीन


पंजाबी गायक आणि काँग्रेस नेत सिद्धू मुसेवाला आज अनंतात विलीन झाले. त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावात मोठी गर्दी उसळली होती. झालेली गर्दी लक्षात घेऊन  पोलीसांना तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूची चौकशी होणार आहे. जोपर्यंत चौकशीचे आदेश येत नाहीत, तोवर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. आदेश मान्य करण्यात आल्यानंतर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.  


नुसरत भरुचानं 6000 महिलांसोबत केला वर्ल्ड रेकॉर्ड


 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरूनं ‘जय संतोषी मां’या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. प्यार का पंचनामा आणि सोनू की टिटू की स्वीटी या चित्रपटांमुळे नुसरतला विशेष लोकप्रियता मिळाली. आता लवकरच नुसरतचा जनहित में जारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या नुसरत ही या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.  


अनन्याचा टीझर रिलीज; 23 जुलै रोजी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस


प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली असून येत्या 22 जुलै रोजी ‘अनन्या’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटाचे टीझरही झळकले आहे. सायकलवर स्वार होत, आभाळात उत्तुंग भरारी घेणारी, आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारी एक आगळीवेगळी ‘अनन्या’ दिसत आहे. यात हृता दुर्गुळे  ‘अनन्या’ ही व्यक्तिरेखा साकारत असून तिची जिद्द आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता यात पाहायला मिळणार आहे.


अनन्याचा टीझर रिलीज; 23 जुलै रोजी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस


प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली असून येत्या 22 जुलै रोजी ‘अनन्या’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटाचे टीझरही झळकले आहे. सायकलवर स्वार होत, आभाळात उत्तुंग भरारी घेणारी, आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारी एक आगळीवेगळी ‘अनन्या’ दिसत आहे. यात हृता दुर्गुळे ‘अनन्या’ ही व्यक्तिरेखा साकारत असून तिची जिद्द आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता यात पाहायला मिळणार आहे.