TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
रिलीजच्या अवघ्या काही तासांतच ‘धाकड’, ‘भूलभुलैया 2’ लीक!
बॉलिवूडचे दोन बिग बजेट चित्रपट शुक्रवारी (20 मे) रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. अभिनेत्री कंगना रनौतचा 'धाकड' आणि कार्तिकी आर्यन , कियारा अडवाणीचा 'भूल भुलैया 2' हे द्नही बहुचर्चित चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे दोन्ही चित्रपटांचे निर्माते चांगलेच खूश आहेत. पण, आता निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. रिलीजच्या काही तासांनंतर दोन्ही चित्रपट ऑनलाईन लीक झाले आहेत.
'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व होणार सुरू
ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणणाऱ्या 'कोण होणार करोडपती' या जगद्विख्यात कार्यक्रमाचं नवं मराठी पर्व लवकरच सुरू होणार आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत.
पहिल्याच आठवड्यात 'धर्मवीर'ने केली 13.87 कोटींची कमाई
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा आहे. महाराष्ट्रात सध्या 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' या सिनेमाचाच बोलबाला आहे. पहिल्या आठवड्यात 'धर्मवीर' सिनेमाने 13.87 कोटींची कमाई केली आहे. तर आता दुसऱ्या आठवड्यातदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारीदेखील अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला आहे.
अमृता फडणवीसांची 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस यांना कलेची आवड आहे. त्यामुळे त्या आता 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला पोहोचल्या आहेत.
कान्सच्या रेड कार्पेटवर युक्रेनमधील महिलेच्या घोषणा
सध्या सोशल मीडियावर कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींचे रेड कार्पेट लूक व्हायरल होत आहेत. हॉलिवूड बरोबच बॉलिवूडचे कलाकार देखील या फेस्टिव्हलमध्ये सहगभागी झाले आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर एका महिलेनं नुकत्याच 'स्टॉप रेपिंग अस' अशा घोषणा दिल्या. या महिलेचा लूक पाहून तिथे उपस्थित असणारे अनेक लोक थक्क झाले.
रिंकूचा नवा चित्रपट; आठवा रंग प्रेमाचा
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात. तिचा 'आठवा रंग प्रेमाचा' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रिंकूनं या नव्या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली.
सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं 'Jeena Zaroori Hai' रिलीज
छोटा पडदा गाजवलेला आणि बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'जिना जरुरी हैं' ( Jeena Zaroori Hai) असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणं ऐकून सिद्धार्थचे चाहते भावूक झाले आहेत.
‘NTR 31’ या नव्या चित्रपटाची घोषणा!
साऊथ स्टार ज्युनियर एनटीआरने नुकताच त्याचा 39वा वाढदिवस साजरा केला. त्याचा यंदाचा वाढदिवस त्याच्यासाठी आणखी खास बनला आहे. यंदाच्या वर्षी रिलीज झालेला त्याचा ‘RRR’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता या खास दिवसाच्या निमित्ताने त्याला 'KGF: Chapter 2'चे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्याकडून खास भेट मिळाली आहे. एनटीआरच्या वाढदिवशी प्रशांत नील यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अद्याप नाव न ठरलेल्या या चित्रपटाला NTR31 म्हटले जाणार आहे.
'या' आठवड्यात कोणती मालिका ठरली प्रेक्षकांच्या आवडती?
मराठी मालिका विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. मागील आठवड्यात 'आई कुठे काय करते' ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. आता ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर 'रंग माझा वेगळा' ही मालिका होती. या आठवड्यात मात्र ' रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या स्थानावर आहे.
बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा बोलबाला
बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा 'धाकड' आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या दोन्ही सिनेमांची सध्या बॉक्स ऑफिसवर टक्कर होत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी कंगनाचा 'धाकड' सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. तर 'भूल भुलैया 2'चा चांगलाच बोलबाला पाहायला मिळाला.
'कान्स 2022'च्या रेड कार्पेटवर ‘सफेद’ सिनेमाच्या टीमची हवा
आंतरराष्ट्रीय स्तरावर आगामी 'सफेद' सिनेमाची ख्याती घेऊन जात, निर्माते भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लीजेंड स्टुडिओजने त्यांच्या सिनेमाचा फर्स्ट लुक अनावरण करण्यासाठी 'कान्स 2022' या शोची निवड केली आहे. या सिनेमातील मुख्य कलाकार अभिनेत्री मीरा चोप्रा आणि अभिनेता अभय वर्मा आणि दिग्दर्शक-लेखक संदीप सिंग, निर्माते विनोद भानुशाली आणि सहनिर्माते विशाल गुरनानी आणि जुही पारेख मेहता यांनी यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे.