या सिनेमाने शनिवारी 17.10 कोटी रुपयांची कमाई केली. तर पहिल्या दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच एकूण 30.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आणि रविवारच्या 21.25 कोटींसह या सिनेमाने एकूण 51.45 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
टॉयलेट एक प्रेम कथा हा एक सामाजिक संदेश देणारा सिनेमा आहे. केवळ 18 कोटी रुपये एवढ्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या सिनेमाने बजेटचा खर्च अगोदरच वसूल केला आहे.
‘टॉयलेट एक प्रेम कथा’ भारतात 3 हजार आणि वर्ल्डवाईड 590 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. याच प्रकारे कमाई झाल्यास या वीकेंडपर्यंत सिनेमाची एकूण कमाई 50 कोटींपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज लावला जात होता. मात्र या अंदाजापेक्षा पहिल्या तीन दिवसात कमी कमाई केली. पण 15 ऑगस्टच्या सुट्टीचा सिनेमाला फायदा होणार आहे.
संबंधित बातम्या :