मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफचा मोस्ट अवटेड ‘टायगर जिंदा है’ सिनेमा येत्या 22 डिसेंबरला रिलीज होणार आहे. बॉलिवूडच्या ‘टायगर’ला हॉलिवूडचा ‘रॉक’ टक्कर देणार आहे.
डब्ल्यूडब्ल्यूईचा माजी रेसलर द रॉकचा ‘जुमांजी : वेलकम टू द जंगल’ हा सिनेमाही यंदा ख्रिसमसमध्ये रिलीज होत आहे. त्यामुळे भारतात रॉकच्या सिनेमाची टक्कर बॉलिवूडच्या दबंगशी असणार आहे.
‘टायगर जिंदा है’ 22 डिसेंबरला, तर ‘जुमांजी’ 29 डिसेंबरला रिलीज होणार आहे. म्हणजेच अगदी आठवड्याभराचा फरक आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमांमध्ये टक्कर होणार, एवढं निश्चित.
सलमान-कतरिना जोडीच्या ‘टायगर जिंदा है’ सिनेमाची उत्सुकता प्रचंड आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी म्हणजे हा सिनेमा आहे. तर दुसरीकडे, रॉकचा ‘जुमांजी’ हा चिमुकल्यांसाठी पर्वणी ठरणारा सिनेमा आहे. ‘जुमांजी’ हा फॅण्टसी अॅडव्हेंचर सिनेमा असून, 1995 साली या सिनेमाचा पहिला भाग रिलीज झाला होता.
‘जुमांजी : वेलकम टू द जंगल’ हा सिनेमा भारतात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
बॉलिवूडच्या ‘टायगर’ला हॉलिवूडच्या ‘रॉक’ची टक्कर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Nov 2017 05:51 PM (IST)
‘टायगर जिंदा है’ 22 डिसेंबरला, तर ‘जुमांजी’ 29 डिसेंबरला रिलीज होणार आहे. म्हणजेच अगदी आठवड्याभराचा फरक आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमांमध्ये टक्कर होणार, एवढं निश्चित.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -