याचदरम्यान सिनेमाचं आणखी एक पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये दीपिका पादूकोणच्या हातात आग असलेलं एक भांडं दिसत आहे. मोकळे केस आणि दागिन्यांनी मढलेली दीपिका चहूबाजूंनी लाल रंगाच्या साड्या नेसलेल्या महिलांनी वेढलेली आहे. हा क्लायमॅक्सचा सीन म्हणजे जोहरचा असल्याचं म्हटलं जात आहे.
दीपिकाचा हा लूक प्रेक्षकांना आवडत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
https://twitter.com/bhansaliprod_fc/status/928114059894910977
विशेष म्हणजे या पोस्टरवर प्रदर्शनाची तारीख 30 नोव्हेंबर लिहिली आहे. तर भारतात 'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी सिनेमागृहांमध्ये झळकेल. मात्र हा सिनेमा यूएईमध्ये एक दिवस आधी म्हणजे 30 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादूकोण, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. तर पद्मावती चित्रपटात रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.
संबंधित बातम्या
'पद्मावती'मधील 'घुमर' गाणं रिलीज, दीपिकाचा अनोखा अंदाज
‘पद्मावती’तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रिलीज डेटही निश्चित!
रिलीजआधी 'पद्मावती'चा विक्रम; 'बाहुबली', 'दंगल'ला मागे टाकलं