मुंबई : टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरच्या 'बागी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. गेल्या आठवड्यात 29 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या 'बागी'ने सुमारे 50 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या या यशानंतर अभिनेता टायगर श्रॉफने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

प्रेक्षकांनी गौरवलेल्या 'सैराट'ला बॉक्स ऑफिसवर 'बागी'ची टक्कर


 

"या सिनेमासाठी मी खूप मेहनत घेतली होती, त्यामुळे सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत झोपही येत नव्हती. आता कुठे शांत झोप लागत आहे. माझ्या मेहनतीला दाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. हे सगळं तुमच्या प्रेमामुळेच शक्य झाले," अशा शब्दात टायगरने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.


बागीने मागच्या आठवड्यात जबरदस्त ओपनिंग मिळवली होती. पहिल्याच दिवशी सिनेमाने 11.94 कोटी रुपयांची शानदार कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही सिनेमाची क्रेज कायम राहिली, शनिवारी सिनेमाने 11.13 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर रविवारी बागीने आठवड्यातील सर्वात जास्त म्हणजे 15.51 कोटी रुपयांची कमाई केली होती. सिनेमाने आतापर्यंत चार दिवसांत एकूण 43.88 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच परदेशातही 'बागी' कोटीच्या कोटी उड्डाणं घेत आहे. 'बागी;ने वर्ल्डवाईड 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

टायगर श्रॉफने साजिद नाडियावाला यांच्या 'हिरोपंती सिनेमातून पदार्पण करत सर्वोत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कारही पटकावला होता. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या सिनेमाविषयी सर्वांना उत्सुकता लागली होती. हे यश पाहता प्रेक्षकांच्या उत्सुकतेला टायगरच्या दमदार अभिनयाने चांगला न्याय दिला आहे, असंच म्हणावं लागेल.