Ahaan Panday debut from  Yash Raj Films :   यशराज फिल्मस् आता आपल्या आगामी चित्रपटातून आणखी एका नव्या चेहऱ्याला संधी देणार आहेत. आशिकी-2 चा दिग्दर्शक मोहित सुरी (Mohit Suri) या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक-निर्माते आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी या अभिनेत्याला ग्रुम केले असून अनन्या पांडेसोबत (Ananya Panday) त्याचे स्पेशल नातं आहे. अहान पांडे हा अभिनेता 'यशराज'च्या चित्रपटातून बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर  पदार्पण करणार आहे. अहान हा अनन्याचा चुलत भाऊ आहे.


अहान पांडेला यशराज फिल्म्समधून मिळाला ब्रेक


यशराज फिल्म्सने अनेक नवे चेहरे लॉन्च केले आहेत. या कलाकारांनी आता बॉलिवूडमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. यामध्ये  अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग यांच्याही नावाचा समावेश आहे. रणवीर-अनुष्काने 2010 मध्ये बँड बाजा बारात या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आता यशराजच्या  चित्रपटात अहान पांडेला लाँच करणार आहेत. 


अहान पाच वर्षांपासून यशराजशी जोडला आहे!


ट्रेड सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहान पांडे गेल्या पाच वर्षांपासून यशराज फिल्म्सशी जोडला गेला आहे. बऱ्याच वर्षांनंतर YRF पुन्हा एकदा नवीन चेहरा लाँच करणार आहे. YRF ने या पाच वर्षांत अहान पांडेला अभिनेता म्हणून ग्रुम केले आहे. स्वत: आदित्य चोप्रा यांनी अहान पांडेवर विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे अहानच्या बॉलिवूड पदार्पणावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


मोहित सुरीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करणार?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित सुरीच्या चित्रपटासाठी अहान पांडेला कास्ट करण्यात आले आहे. अहानला रोमँटिक हिरोच्या रुपात चित्रपटांमध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. मोहित सुरीचा हा चित्रपट तरुणाच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपट असू शकतो. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. अहान पांडे 2024 च्या अखेरीस मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.


दिग्दर्शक मोहित सूरीने बॉलिवूडला अनेक रोमँटिक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांमध्ये आशिकी 2, एक खलनायक आणि 'हमारी अधुरी कहानी' यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आता दिग्दर्शक नव्या हिरोसोबत आणखी एक रोमँटिक चित्रपट आणणार आहे. 


इतर संबंधित बातम्या :