OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील प्रेक्षकांना रोमान्स, अॅक्शन, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 

डियर विक्रमकधी होणार प्रदर्शित? 30 जूनकुठे होणार प्रदर्शित? वूट

'डियर विक्रम' हा सिनेमा राजकारणावर बेतलेला आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा एस नंदीशने सांभाळली आहे. तर जॅकब फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. या सिनेमात सतीश निनासम, श्रद्धा श्रीनाथ, विशिष्ठ एन मुख्य भूमिकेत आहेत. हा कन्नड सिनेमा 30 जूनला वूटवर रिलीज होणार आहे. 

धाकडकधी होणार प्रदर्शित? 1 जुलैकुठे होणार प्रदर्शित? झी 5

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या 'धाकड' सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळेल. रजनीश घईने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर सोहेल मकाईने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात कंगना एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. पण आता हा सिनेमा 1 जुलैपासून प्रेक्षक झी 5 वर पाहू शकतात. 

मीयां बीबी और मर्डरकधी होणार प्रदर्शित? 1 जुलैकुठे होणार प्रदर्शित? एमएक्स प्लेअर

'मीयां बीबी और मर्डर' ही वेबसीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना थ्रिलर पाहायला मिळणार आहे. ही विनोदी वेबसीरिज पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या वेबसीरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही सीरिज 1 जुलैला एमएक्स प्लेअरवर सुरू होणार आहे. 

सम्राट पृथ्वीराजकधी होणार प्रदर्शित? 1 जुलैकुठे होणार प्रदर्शित? अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली जादू दाखवू शकला नाही. 200 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खूपच कमी कमाई केली. आता हा सिनेमा 1 जुलैला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होत आहे. 

संबंधित बातम्या

Phone Bhoot Teaser : कतरिना कैफच्या 'फोन भूत'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार रिलीज

Jug Jugg Jeeyo Box Office Collection : पहिल्या आठवड्यात 'जुग जुग जियो'ची बॉक्स ऑफिसवर जादू; जाणून घ्या कलेक्शन

DID Li'l Masters Winner : असामच्या Nobojit Narzary नं जिंकला डीआयडी लिटिल मास्टर सीजन-5 चा किताब