मुंबईः अभिनेता अमिर खानच्या आगामी दंगल सिनेमात एकही गाणं नाही, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. या सिनेमात केवळ एकच प्रमोशनल गाणं असेल, असंही बोललं जात आहे.
मात्र या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचं दिसत आहे. कारण संगीतकार प्रीतम चक्रवर्ती या सिनेमाच्या गाण्यांवर काम करत असल्याचं समोर आलं आहे.
दंगल सिनेमासाठी काही गाण्यांची रेकॉर्डिंग देखील झाली आहे. या गाण्यांची शुटींग येत्या काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे. हा सिनेमा इतर सिनेमांच्या तुलनेत वेगळा असल्याने सिनेमाला साजेसं संगीत बनवणं आव्हानात्मक काम आहे.
दंगल सिनेमात संगीत नसेल या केवळ अफवा असल्याचं समोर आलं आहे. या सिनेमातील दृश्यांप्रमाणे बॅकग्राऊंड म्युझिक तयार करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. प्रीतम चक्रवर्तीने यापूर्वी ए दिल है मुश्किल, राबता आणि जग्गा जासूस या सिनेमांसाठी संगीत दिलेलं आहे.