मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ सिनेमाचा ट्रेलर उद्या म्हणजे 30 जूनला सकाळी 9 वाजता ट्रेलर रिलीज होणार आहे. ट्रेलरची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, अक्षय कुमारने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याद्वारे ‘रुस्तम’मधील आपल्या भूमिकेचं नाव त्याने सांगितलं आहे.
‘रुस्तम’ सिनेमातल्या अक्षय कुमारच्या भूमिकेची सर्वांनाच उत्सुकता आहे. रुस्तम सिनेमात अक्षय कुमार एका नौदलातील अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार नौदल अधिकाऱ्याच्या वर्दीत दिसत आहे. रुस्तम पावरी असे या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचं नाव आहे.
https://twitter.com/akshaykumar/status/748101404783370240
‘3 SHOTS THAT SHOCKED THE NATION’ अशी उत्सुकता वाढवणारी टॅगलाईन ‘रुस्तम’ सिनेमाची आहे. येत्या 12 ऑगस्टला अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित ‘रुस्तम’ सिनेमा रिलीज होणार आहे.
https://twitter.com/akshaykumar/status/747791868348366850