मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा मोठा स्टार नाही, असे प्रतिपादन बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने केले आहे. गुरुवारी मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना आमिर खानने बाळासाहेबांवर स्तुतीसुमने उधळली.


वैद्यकीय शिक्षण विभाग आणि डॉ. संजय बोरूडे यांनी लठ्ठपणावरील चाईल्ड ओबेसिटी या संकेतस्थळाचे गुरूवारी मंत्रालयात आमिर खानच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.

एकीकडे देशात कुपोषणाची समस्या असून दुसरीकडे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर लठ्ठपणा वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून www.childobesity.in या वेबसाइटचे अनावरण करण्यात आले आहे. या वेबसाइट्द्वारे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक तज्ज्ञ डॉक्टराशी संवाद साधू शकतील. त्यामुळे या ओबेसिटीचे निदान केले जाणार आहे.

बाळासाहेबांबद्दल काय म्हणाला आमिर?
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सध्या वाद सुरु आहे. ठाकरे चित्रपटासोबत क्लॅश होणाऱ्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. याबाबत आमिरला प्रश्न विचारल्यावर आमिर म्हणाला की, "महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही. सर्वांनाच बाळासाहेबांचा चित्रपट पाहायचा आहे. त्यामुळे कोणताही निर्माता या चित्रपटासोबत स्पर्धा करणार नाही".

संबधित बातम्या : 'ठाकरे' साठी दोन हिंदी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या!

                    गोविंदाने कादर खान यांची कधीही विचारपूस केली नाही : सरफराज खान

महाराष्ट्र शासनाच्या ‘लठ्ठपणाशी लढा’ #FightObesity उपक्रमासाठी ब्रीच कँडी रूग्णालयातील ओबेसिटी सर्जन डॉ.संजय बोरूडे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या https://t.co/3oj55TJveK या संकेतस्थळाचा वैद्यकीय शिक्षणमंत्री @girishdmahajan ,अभिनेता @aamir_khan यांच्या हस्ते शुभारंभ. pic.twitter.com/LFSyErlpqz