फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो शहरात ‘द व्हॉईस’ स्टार क्रिस्टिना ग्रिमीची हत्या करण्यात आली आहे. म्युझिकल शोनंतर चाहत्यांना ऑटोग्राफ देताना गायिका क्रिस्टिनावर गोळीबार करणयात आला, त्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान क्रिस्टिनाचा मृत्यू झाला.
अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम ‘द व्हॉईस’मध्ये सहभागी झालेली क्रिस्टिना ग्रिमीवर चाहत्यांना ऑटोग्राफ देताना गोळीबार झाला.
हल्लेखोराला क्रिस्टिनाच्या भावाने पकडलं होतं. मात्र, क्रिस्टिनावर गोळी झाडल्यानंतर हल्लेखोराने स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली.
क्रिस्टिनोचं शेवटचं ट्वीट :
https://twitter.com/TheRealGrimmie/status/741387106921140224
22 वर्षीय क्रिस्टिनावर गोळीबार झाल्यानंतर, तिला जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी हल्लेखोराचं नाव जाहीर केलं नाही. मात्र, हल्लेखोराकडे दोन बंदुका होत्या, अशी माहिती मिळते आहे. हल्ल्यामागच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.
2014 साली ‘द व्हॉईस’च्या सहाव्या मोसमात क्रिस्टिना तिसऱ्या क्रमांकावर होती.