मुंबई : सुपरस्टार रजनीकांतचा आगामी ‘कबाली’ सिनेमा प्रदर्शनाआधीच यशस्वी झाला आहे. सॅटेलाईट आणि डिस्ट्र्युब्युशन राईट्स विकून सिनेमाने 200 कोटींची कमाई केली आहे. कबाली सिनेमाच्या निर्मितीसाठी 160 कोटींचा खर्च आला आहे.

 

कबाली सिनेमा भारतासह जगभरातील 5 हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे. विशेष म्हणजे कबाली सिनेमाच्या रुपाने पहिल्यांदाच एखादा भारतीय सिनेमा जगभरातील 5 हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे. मलेशिया, चीन आणि थायलंड देशांत्या भाषेतही सिनेमा डब करण्यात आला असून, 1 जुलै रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. अमेरिकेमध्ये 500 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

 

कबाली सिनेमाचे निर्माते कलाईपुली थानू यांच्या माहितीनुसार, कबाली सिनेमासाठी 500 स्क्रीन अमेरिकेत बुक केल्या असून, या सिनेमाचं प्रमोशनही मोठ्या ताकदीने केलं जाणार आहे.

 

कबाली सिनेमाचा पहिला टीझर 1 मे रोजी लॉन्च केला गेला. यू ट्यूबवर या टीझरला आतापर्यंत 2 कोटींहून अधिक व्ह्यूज असून, 67 सेकंदाचा हा टीझर रजनीकांतच्या हटके स्टाईलमध्ये दाखवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं म्युझिकही सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.

 

या सिनेमात रजनीकांत डॉन कबालीश्वरनच्या भूमिकेत असून, मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेही मुख्य भूमिकेत आहे. तैवानचा सुपरस्टार विनस्टॉन चाओ याने सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे.

 

कबाली सिनेमाचा टीझर -