Chaar Choughi : मराठी नाट्यविश्वात सध्या नवे-नवे प्रयोग होत आहेत. अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग सध्या रंगभूमीवर होत आहेत. सध्या सुरू असलेल्या नाटकांना नाट्यरसिक उत्तम प्रतिसाद देत आहेत. नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच रंगभूमीवर एक नवीन नाटक येणार आहे. 'चारचौघी' (Chaar Choughi) असे या नाटकाचे नाव आहे.
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'चारचौघी' या नाटकात रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'जिगीषा'ने या नाटकाची निर्मिती केली आहे. तर प्रशांत दळवीने या नाटकाचं लेखन केलं आहे. अशोक पत्की यांनी या नाटकाचं संगीत केलं असून संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची धुरा सांभाळली आहे.
मराठमोळी, अभ्यासू अभिनेत्री मुक्ता बर्वे एका मोठ्या गॅपनंतर मराठी रंगभूमीवर दिसून येणार आहे. 15 ऑगस्ट 1991 रोजी 'चारचौघी' हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. आता हे नाटक नव्या संचात पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रशांत दळवी यांनी लिहिलेल्या 'चारचौघी' या नाटकात 31 वर्षांपूर्वी वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर आणि दीपा श्रीराम यांच्या या नाटकात मुख्य भूमिका होत्या.
स्त्रियांची मतं, त्यांचे निर्णय याबद्दल सखोल दर्शन घडवणारं 'चारचौघी' हे नाटक त्याकाळी खूप गाजलं होतं. आता हेच नाटक तब्बल एकतीस वर्षांनी एका नव्या संचात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नाटकाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या नाटकाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.
शुभारंगाचे प्रयोग
- शनिवार 17 सप्टेंबर दु. 4 वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
- रविवार 18 सप्टेंबर दु. 4 वा. शिवाजी मंदिर, दादर
संबंधित बातम्या