The Night Manager 2 Trailer : 'द नाईट मॅनेजर' या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन (The Night Manager 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर आऊट झाला आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांची सीरिजबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


'द नाईट मॅनेजर'च्या दुसऱ्या सीझनमध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'द नाईट मॅनेजर 2' ही सीरिज प्रेक्षक येत्या 30 जूनपासून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपालासह तिलोत्तमा शोम, रवी बहल, शाश्वत चॅटर्जी हे कलाकारदेखील या सीरिजमध्ये दिसणार आहेत. 


थरार नाट्य असणाऱ्या 'द नाईट मॅनेजर 2'ची चाहत्यांना उत्सुकता


रावणाची लंका जाळण्यासाठी आग तर लावावीच लागेल, असे डायलॉग 'द नाईट मॅनेजर 2'च्या ट्रेलरमध्ये आहेत. त्यामुळे आता या सीरिजमध्ये शॉन शैलीची लंका जाळताना दिसणार आहे. थरार नाट्य असणाऱ्या 'द नाईट मॅनेजर 2' या सीरिजमध्ये अनेक रहस्यमय गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. 


'द नाईट मॅनेजर 2' या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा प्रियांका घोष आणि संदीप मोदीने सांभाळली आहे. जॉन ले कॅरी (John Le Carre) यांनी लिहिलेल्या ब्रिटिश मालिका 'द नाईट मॅनेजर'वर बेतलेली ही मालिका आहे. या बहुचर्चित सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 






'द नाईट मॅनेजर'चा पहिला सीझन संपल्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये काय होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. 'द नाईट मॅनेजर 2'च्या ट्रेलरमधील अनिल कपूरच्या हँडसम लूकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पहिल्या सीझनपेक्षा दुसरा सीझन अधिक नाट्यमय, क्रूर आणि उत्साहवर्धक दिसणार आहे. 


'द नाईट मॅनेजर'मध्ये अनिल आणि आदित्य रॉय कपूर ही सुपरहिट जोडी दिसली होती. अनिल कपूरचे 'अॅनिमल' आणि 'फायटर' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अनिल कपूरने 'द नाईट मॅनेजर 2'चा ट्रेलर शेअर करत लिहिलं आहे,"शैलीची लंका जाळण्यासाठी शान तयार आहे. बहुचर्चित वेबसीरिजचा शेवट लवकरच समोर येणार". 


संबंधित बातम्या


The Night Manager Review : भव्यता, रोमांच आणि नाट्यमय संघर्ष मांडणारी 'द नाईट मॅनेजर'