The Night Manager Web Series Review : अनिल कपूर (Anil Kapoor) आणि आदित्य रॉय कपूरची (Aditya Roy Kapur) 'द नाईट मॅनेजर' (The Night Manager) ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. ब्रिटीश वेब सीरिजचं भारतीय रुपांतर करण्यात आलेली ही वेबसीरिज अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दोन भागांमध्ये ही सीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे. आतापर्यंत या वेब सीरिजचे चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून उर्वरित भाग जूनमध्ये प्रदर्शित करण्यात येतील. 


डिस्ने प्लस हॉटस्टारवरील अनेक वेब सीरिजचं रुपांतर करण्यात आलं आहे. यात क्रिमिनल जस्टिस ते आऊट ऑफ लव्ह पर्यंत अनेक वेब सीरिजचा समावेश आहे. या सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आता या यादीत 'द नाईट मॅनेजर'चे नाव जोडले गेले आहे. 


'द नाईट मॅनेजर' या अॅक्शन, थ्रिलर वेब सीरिजचं दिग्दर्शन संदीप मोदीने केलं आहे. भव्य-दिव्यता, सूट-बुटांतले स्टायलिश कलाकार, अॅक्शन, उत्तम लोकेशन्स अशा सर्व गोष्टींमध्ये ही सीरिज उजवी ठरत असली तरी काही गोष्टी मात्र खटकतातच. या सीरिजमध्ये थरार कुठेतरी कमी पडला आहे. मात्र कथा, व्हिज्युअल आणि कलाकारांचा अभिनय उत्तम असल्यामुळे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 


'द नाईट मॅनेजर'चं कथानक काय? 


शंतनु सेनगुप्ता हा ढाका येथील द ओरिएंट पर्ल या हॉटेलमध्ये नाईट मॅनेजरचं काम करतो आहे. या हॉटेलमध्ये त्याला मालक फ्रेडी रहमानची लेक सफीना भेटते. फ्रेडी हा हॉटेलचा मालकच नाही तर अवैध शस्त्रास्त्रांचा व्यापार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्यही आहे. त्यामुळे सफिना शंतनुकडे मदत मागते. सफिनाकडून या संदर्भात पुरावे मिळाल्यानंतर शंतनू भारतीय गुप्तचर संस्थेच्या मदतीने तिची सुटका करुन तिला भारतात पाठवण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान फ्रेडीच्या ही गोष्ट लक्षात येते आणि तो त्याच्या लेकीची सफिनाची हत्या करतो. त्यामुळे शंतनु अपयशी ठरतो. 


शंतनूला कुठेतरी अपराधीपणा सतावत राहतो. काही काळानंतर तो शैलेंद्र सिंग रुंगटा यांच्या टोळीत सामील होतो आणि रिसर्च अॅडमिनिस्ट्रेशन विंगच्या अधिकारी लिपिका सैकिया राव यांच्या माध्यमातून तो हेरगिरी करु लागतो. शंतनू त्याच्या मिशनमध्ये यशस्वी होईल का? तो सफिनाच्या मृत्यूचा बदला घेऊ शकेल का? रुंगटा आधीच शंतनुला पकडेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना सीरिजच्या पुढील भागांमध्ये मिळणार आहेत. 


द नाईट मॅनेजरची पटकथा पठाणचे लेखक श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे. या वेब सीरिजची सुरुवात शंतनु पोलिसांपासून पळून जाण्याच्या दृश्यांनी होते. यानंतर कथा बांगलादेशच्या ढाका शहरात पोहोचते, जिथे शंतनु हॉटेलचा नाईट मॅनेजर आहे.


वेब सीरिजची सुरुवात चांगली दाखवण्यात आली आहे. पण लगेचच दुसऱ्या भागानंतर ती आपली पकड गमावते. नाईट मॅनेजर शंतनु आणि शैलेंद्र यांच्या भेटीने वेबसीरिजमध्ये नवा ट्विस्ट येतो. या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना, थरार, साहस आणि अॅक्शन सीन्स पाहायला मिळतील. या सीरिजमध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम मुख्य भूमिकेत आहेत.


पावरफुल 'जया'ची गोष्ट; वाचा 'जया जया जया जया हे' चित्रपटाचा रिव्ह्यू