नेहमीच वादात राहणारी अभिनेत्री राखी सावंतनं प्रत्युषासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिनं मोदी सरकारकडे एक विचित्र मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत राखी चक्क सीलिंग फॅनच हातात घेऊन आली. 'फक्त भारत माता की जय बोलणं जास्त जरुरी नसून घरातून सीलिंग फॅन हटवणं जरुरीचं आहे.' राखी इथंच थांबली नाही तर तिनं थेट पंतप्रधान मोदींकडेच याबाबत मागणी केली आहे.
'मी पंतप्रधान मोदींना आवाहन करु इच्छिते की, देशामध्ये सीलिंग फॅन बॅन करायला हवे. जेणेकरुन आत्महत्यासारख्या घटना घडणार नाही.' असंही राखीही म्हणाली.
सीलिंग फॅनला लटकून आमच्या मुली-बाळी मरतायत, अशावेळी मोदींनी सीलिंग फॅनच्या उत्पादनावर बंदी आणायला हवी. फक्त टेबल फॅन किंवा एसी वापरण्याचे आदेश काढायला हवे.
मुंबईतील अंधेरी येथील आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकून प्रत्युषानं आत्महत्या केली होती. दरम्यान, स्टटंबाजी आणि वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारी राखी प्रत्युषाच्या मृत्युची बातमी ऐकून थेट रुग्णालयातही गेली होती. त्यावेळी तिने प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडवर बरेच आरोप केले होते.
राखीच्या मते, प्रत्युषाला तिच्या बॉयफ्रेंडनेच धोका दिला. त्यामुळेच तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा.