Boyz 3 : 'बॉईज 3' (Boyz 3) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. गेल्या आठवड्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रिलीजच्या एका आठवड्यात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 4.96 कोटींची कमाई केली आहे. 


'बॉईज 3' या सिनेमाची तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक सिनेमागृहांमध्ये 'बॉईज 3' सिनेमाचे शोज वाढवण्यात आले आहेत. अनेक सिनेमागृहांमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. तरुणांसोबतच कुटुंबीयही या सिनेमाचा आनंद घेत आहेत. 






'बॉईज 3' या सिनेमातील डायलॉगपासून गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळेच टाळ्या-शिट्ट्या वाजवत प्रेक्षक सिनेमाला दाद देत आहेत. 'बॉईज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर 'बॉईज 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि आता 'बॉईज 3' रिलीज झाला आहे. लवकरच या सिनेमाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


सिनेमाच्या यशाबद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाला,"सध्या  आमची 'बॉईज'ची टीम अवघ्या महाराष्ट्रात फिरत आहे आणि तिथून मिळणारा प्रतिसाद, प्रेम पाहाता सिनेमाच्या सर्व टीमच्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळत आहे. 'बॉईज 1', 'बॉईज 2' ला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम आता 'बॉईज 3' ला तिपटीने वाढले आहे. 'बॉईज'ची ही धमाल आता लवकरच चौपट होणार आहे. सिनेमात 'बॉईज 4' ची घोषणा आम्ही केली असून 'बॉईज 4' लाही प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळेल, अशी मला खात्री आहे".


संबंधित बातम्या


Boyz 3 : 'बॉईज 3'ने वीकेंडला केली कोट्यवधींची कमाई; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार चौथा भाग


Boxoffice Movies : वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बॉक्स ऑफिसवर आहे मराठी सिनेमांचा दबदबा