The Kerala Story'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. पण या चित्रपटावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक ट्वीट शेअर करुन द केरळ स्टोरी या चित्रपटावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी  प्रत्युत्तर दिलं आहे. 


जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट


जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर 96 टक्के आहे. जो भारताचा 76 टक्के आहे. केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणारी लोक ही 0.76 टक्के आहेत. देशामध्ये ती 22 टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये 6 टक्के आहे.


आसाममध्ये 42 टक्के आहे आणि उत्तरप्रदेश मध्ये 46 टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या 7 टक्के अधिक आहे. त्या चित्रपटामध्ये जी 32 हजार महिलांची कथा सांगितली गेली, त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की ही कथा फक्त 3 महिलांची आहे. चित्रपट चालवा यासाठी 32 हजार महिला सांगितल्या होत्या. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत त्यांना काही समजतच नाही त्या वाटेल तश्या वागतात असे प्रदर्शित करायचं आणि शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला ह्या गौण आहेत असं चित्र उभं करायचं. हेच केरळ वर आधारीत चित्रपटाच खरं सत्य आहे. असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात.






चित्रा वाघ यांचे  प्रत्युत्तर


चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर करुन जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातून मांडलेला धर्मांतरासारखा मुद्दा सत्य घटनेकडे डोळेझाक करणा-या जितेंद्र आव्हाडांना गंभीर वाटत नसेल तर त्यांनाच लाज वाटायला हवी…जितेंद्र आव्हाड यांच्या आत्ता पर्यंतच्या भूमिका यात खतपाणी घालणा-याच आहेत.. मुळात त्यांना एवढा पुळका येण्याचं कारण समजू शकते त्यांची रोजी रोटी याच वोट बॅंकेवरच चालते पण वोट बॅंकच्या नादात तुम्ही मुंब्र्याचा छोटा पाकिस्तान तयार करण्याचं पाप केलंय हे पण विसरू नका.'






इतर महत्वाच्या बातम्या:


The Kerala Story: MP नंतर आता UP मध्ये 'द केरळ स्टोरी' होणार करमुक्त; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा