The Kashmir Files : सध्या द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट चर्चेत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपट मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये पल्लवी यांनी या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, 'प्रत्येक भारतीयानं माझ्या भूमिकेचा द्वेष करावा'
पल्लवी जोशी यांनी एका प्रोफेसरची भूमिका साकारली आहे. जी कश्मीरमधील विद्यार्थ्यांना स्वतंत्र कश्मीर होण्यासाठी लढायला प्रेरित करतात. रिपोर्टनुसार, एका मुलाखतीमध्ये जेव्हा पल्लवी यांना विचारण्यात आलं की ही भूमिका साकारण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, ' जेव्हा मी काश्मिरी पंडितांच्या वेदना जाणून घेतल्या, तेव्हा 'या' खलनायिकी पात्राला केवळ मीच समजू शकत होते. त्यानंतर मी ही भूमिका साकारायचे ठरवले. तसेच मी ही भूमिका लोकांसमोर जोरदार पद्धतीनं मांडण्याचे ठरवलं. त्यामुळे प्रत्येक भारतीयानं या भूमिकेचा द्वेष करावा.'
त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्रिहोत्री यांना प्रश्न विचारण्यात आला की, 'या भूमिकेमुळे विश्वविद्यालयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे का?' यावर विवेक यांनी उत्तर दिले, 'रिसर्च करा आणि गूगलवर तुम्ही माहिती शोधा. तुम्हाला उत्तर मिळेल. '
हेही वाचा :
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- The Kashmir Files : मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरातनंतर 'या' राज्यांत 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त
- The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर...; काँग्रेसचा गंभीर आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha