Vivek Agnihotri On The Kashmir Files 2 : 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर प्रेक्षक आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पुढल्या वर्षात या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाची निर्मिती 15 कोटींमध्ये करण्यात आली असली तरी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. रेकॉर्डब्रेक कमाई करत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटींचा टप्पा पार केला. नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करणारा हा सिनेमा आहे.
सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने काश्मीरी पंडितांवर अत्याचार होतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले आहे,"काश्मिरी पंडितांची हत्या होत आहे. हिंदुत्वाची भूमिका घेणारं सरकार झोपलं आहे का? की हत्या, अत्याचार या गोष्टींचा सरकारला फरक पडत नाही का? नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्या आणि अमानुष अत्याचारांचा आता पुन्हा काश्मीरी पंडितांना सामना करावा लागत आहे". या ट्वीटला रीट्वीट करत श्रेयांश त्रिपाठीने विवेक अग्निहोत्रीला टॅग करत विचारलं आहे," या घटनेवर विवेक अग्निहोत्री कश्मीर फाइल बनवू शकतो का?".
'द कश्मीर फाइल्स' कधी होणार प्रदर्शित?
श्रेयांश त्रिपाठीने विचारलेल्या प्रश्नाला विवेक अग्निहोत्रीने उत्तर दिलं आहे. विवेकच्या उत्तराने 'द कश्मीर फाइल्स'चे चाहते आनंदी झाले आहेत. त्याने लिहिलं आहे,"काम सुरू आहे. 2023 पर्यंत वाट पाहा".
विवेकच्या उत्तरामुळे 'द कश्मीर फाइल्स'चा दुसरा भाग 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विवेक काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्या आणि अमानुष अत्याचारांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
संबंधित बातम्या