Baisakhi Release 2022 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्सनिस्ट आमिर खानच्या (Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा 14 एप्रिल 2022 ला बैसाखीच्या मुहूर्तावर सिनेमागृहात प्रद्शित होणार आहे. त्याचदिवशी यशचा 'केजीएफ - 2' (KGF-2) सिनेमा तर प्रभासचा 'सालार' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सोबतच वरुण धवन आणि कृती सेननचा 'भेडिया' सिनेमादेखील प्रदर्शित होणार आहे. अशाप्रकारे एकाचदिवशी चार बडे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.





बॉक्स ऑफिसवर बड्या सिनेमांची टक्कर
14 एप्रिल 2022 रोजी बॉलीवूडचे अनेक मोठे कलाकार बॉक्स ऑफिसवर आमनेसामने येणार आहेत. त्याचबरोबर या 4 चित्रपटांव्यतिरिक्त एप्रिल महिन्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी आहे. याच महिन्यात अमिताभ बच्चन आणि अजय देवगणचा 'मेडे', बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा, आर माधवनचा 'रॉकेटरी' तसेच टायगर श्रॉफचा 'हीरोपंती-2' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.





4 बडे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार
पुढील वर्षात एप्रिल महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाचा फुल ऑन डोस मिळणार आहे. बैसाखीच्या दिवशी आमिर, वरुण, यश आणि प्रभास यांच्यापैकी कोण विजेता ठरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. 


संबंधित बातम्या


सलमान खानचा 'Antim' आणि जॉन अब्राहमचा 'Satyameva Jayate 2' आमने-सामने; पुढच्या आठवड्यात होणार प्रदर्शित


Indian Game Show : तब्बल 101 सेलिब्रिटींसह Bharti Singh चा एक जबरदस्त कार्यक्रम, टीझर झाला प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha