मुंबई : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाचा आज प्रदर्शित झाला आहे. मात्र या सिनेमाच्या ट्रेलरमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


चित्रपटातमध्ये अभिनेता अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीतले अनेक किस्से हुबेहुब मांडण्यात आले आहे. ज्यामुळे काँग्रेसविरोधी भावना भडकण्याची शक्यता आहे. ट्रेलरमध्ये काँग्रेस आणि गांधी घरण्यावर टीका करण्यात आली आहे.


2004 ते 2008 या काळात मनमोहन सिंग यांचे सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या संजय बारुंच्या 'द अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत आहे. येत्या 11 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोठ्या वादाची शक्यता आहे.


'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाविरोधात काँग्रेसचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे कोर्टात जाणार आहेत.


तर राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. राजकीय फायद्यासाठी काँग्रेस आणि गांधी घराण्याची बदनामी करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.


पाहा ट्रेलर



संबंधित बातम्या


अॅक्सिडेंटल पीएम, मनमोहन सिंहांच्या भूमिकेत अनुपम खेर!


मनमोहन सिंह यांच्या चित्रपटात राहुल आणि प्रियांका गांधी कोण?