Tejaswini Pandit: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले शेवटचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2023) सध्या सुरु आहे. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. हे अधिवेशन चांगलंच गाजताना दिसतंय. कारण सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेल्या त्रुटीवर केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 141 खासदारांना निलंबित (Parliament MP Suspended) करण्यात आलं. अशातच आता  खासदार निलंबन प्रकरणाबाबत अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) एक ट्वीट शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


तेजस्विनी पंडितचं ट्वीट


तेजस्विनी पंडितनं ट्वीटमध्ये लिहिलं, "चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही….! लोकशाही बसली धाब्यावर !!! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास??" तेजस्विनीनं या ट्वीटला नो डेमोक्रसी आणि अधिवेशन हे दोन हॅशटॅग्स देखील दिले आहेत. 






नेटकऱ्यांच्या कमेंट्स


तेजस्विनीच्या ट्वीटवर कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं तर काहींनी तिचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "तेजस्विनी तुमच्या सारखे स्पष्ट बोलणारे निडर लोकं खुप कमीच राहीले आहेत आत्ता या देशात" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "तेजस्विनी, खरंच तुमच्याबद्दल आदर वाढला. जे चोखपणे तुम्ही तुमचं म्हणणं न घाबरता मांडल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असच तुम्ही तुमचं म्हणणं मांडत रहा. जय संविधान"


काही दिवसांपूर्वी  काही तरुणांनी लोकसभेसह संसद भवनाच्या आवारात गोंधळ घातला. याचप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहून निवेदन द्यावं, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तसेच, सर्व विरोधक आपल्या मागणीवर ठाम आहेत. 


सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह लोकसभेतील अनेक विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे.


तेजस्विनी पंडित ही विविध विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात काही दिवसांपूर्वी तेजस्विनीचा एकदा येऊन तर बघा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Tejaswini Pandit: "राज ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे"; तेजस्विनी पंडितच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष