Tejaswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. तेजस्विनी ही गेल्या कही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील चर्चेत आहे. राजकीय घडामोडींबाबत तेजस्विनी पोस्ट शेअर करते. अशातच आता तेजस्विनीनं नुकतेच नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तेजस्विनीनं पुण्यात मिडनाईट सलून सुरु केले आहे. या सलूनचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. तसेच सिद्धार्थ जाधवनं (Siddharth Jadhav) देखील या सलूनच्या उद्घाटनाला हजेरी लावली.


तेजस्विनीनं शेअर केला व्हिडीओ


तेजस्विनी पंडितनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्विनीच्या सलूनची झलक बघायला मिळत आहे. या व्हिडीओला तेजस्विनीनं कॅप्शन दिलं, "आदरणीय श्री.राज ठाकरे साहेबांचे त्यांच्या उपस्थितीबद्दल आणि आजची संध्याकाळ समृद्ध केल्याबद्दल त्यांचे लाख लाख धन्यवाद!!"


पुढे तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "AM to AM युनिसेक्स सलून, पुण्यातील पहिले मिडनाईट सलून आहे, जिथे प्रत्येक ग्लो-अप हा  प्रेम आणि वनस्पती यांच्या आधारित जादूने तयार केला जातो. पुण्याच्या मध्यभागी वसलेले, आमचे सलून शहराच्या सर्व कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांसाठी आहे,क्विक टच-अप किंवा आनंददायी ब्युटी सेशनसाठी आजच सेशन बुक करा."


पाहा व्हिडीओ:






अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी तेजस्विनीनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला या नव्या व्यावसायासाठी शुभेच्छा दिल्या आहे. 


तेजस्विनी पंडितचे चित्रपट


अगं बाई अरेच्चा'  या चित्रपटामधून तेजस्विनीनं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.वावटळ,रानभूल,टार्गेट,गैर आणि तू ही रे या चित्रपटांच्या माध्यमातून तेजस्विनी प्रेक्षकांच्या भेटीला आली.  एकाच ह्या जन्मी जणू ,100 डेझ,कालाय तस्मै नम: या मालिकांमध्ये देखील तेजस्विनीनं काम केलं. काही महिन्यांपूर्वी तेजस्विनी ही ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार प्रसाद खांडेकर ,ओंकार भोजने या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Tejaswini Pandit : जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय... 'स्वराज्य कनिका - जिजाऊ' सिनेमात तेजस्विनी पंडित साकारणार राजमाता जिजाऊंची भूमिका