TDM Marathi Movie : दिग्दर्शक  भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade)  हे सध्या त्यांच्या  'टीडीएम' (TDM)  या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.  हा चित्रपट चांगला असूनही या चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्याची भावना भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी भाऊराव कऱ्हाडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत,"टीडीएम' हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहे आणि सिनेप्रेमी हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे. पण सिनेमागृहात शो नसल्या कारणाने मराठी प्रेक्षकांवर आणि कलाकारांवर अन्याय होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आता या सर्व प्रकरणावर एक व्हिडीओ शेअर करुन भाऊराव कऱ्हाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


भाऊराव कऱ्हाडे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी  'टीडीएम' चित्रपटाच्या शोबाबत सांगितलं, 'परवापासून सगळ्या महाराष्ट्रात गोंधण सुरु आहे, त्यावर मला बोलायचंय. मी प्रेक्षकांचे आभार मानतो, सोशल मीडियावरील लोकांचे आभार मानतो. त्यांनी हे प्रकरण पुढे आणलं. तुम्ही एका कलाकाराला न्याय देत आहात, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. मी दिलगिरी देखील व्यक्त करतो कारण मी चित्रपटाचे शो थांबवले. त्यामुळे काही प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते पण शो नसल्यानं परत आले. चित्रपटाला शो मिळत नसल्यानं माझा मनस्ताप झाला. त्यामुळे मी शो बंद केले.'



भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगितला किस्सा


व्हिडीओमध्ये भाऊराव कऱ्हाडे यांनी एक किस्सा देखील सांगितला ते म्हणाले, 'मी एका थिएटर मॅनेजरला विचारलं की, किती प्रेक्षक आहेत? तर त्यानं मला सांगितलं की, '90 टक्के प्रेक्षक आहेत.' हे ऐकून मला आनंद झाला. पण त्यानं सांगितलं की, उद्याचा शो कॅन्सल झाला आहे. हे ऐकून मला वाईट वाटलं. आम्ही सगळे कलाकार तेव्हा होतो. प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही थिएटरमध्ये जाणार होतो. सिनेमा संपल्यानंतर आम्ही थिएटरमध्ये गेलो. त्यानंतर प्रेक्षकांनी जी प्रतिक्रिया दिली, ते पाहून मला रडू कोसळलं. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले. प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, त्याबद्दल मी आभार मनतो. '


पुढे भाऊराव कऱ्हाडे  म्हणाले, 'सिनेमा चालत नव्हता म्हणून स्टंटबाजी केली, असं काहींचे मतं होते. मी त्यांना सांगू इच्छितो की, कोणताही स्टंट करण्यासाठी मी हे करत नव्हतो. उगाच प्रसिद्धी मिळवण्यासाठी मी हे केलं नाही. मला जर स्टंट करायचा असता तर मी माझा सिनेमाचं प्रदर्शन थांबवलं नसतं.'


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'TDM'ला थिएटर स्क्रीन मिळत नसल्यानं अजित पवार यांनी केलं ट्वीट; म्हणाले, 'अत्यंत दुर्दैवी...'