सुपरस्टार रजनीकांत यांचं ट्विटर अकाऊंट हॅक
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2016 07:50 AM (IST)
चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. मात्र काही वेळाने ट्विटर हॅण्डल पुन्हा प्राप्त केल्याची माहिती त्यांची मुलगी ऐश्वर्याने दिली आहे. ऐश्वर्याने ट्वीट केलं होतं की, "सुपरस्टार रजनी अप्पाचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. मात्र आता ते पुन्हा मिळवलं आहे. तुम्हा सर्वांचे आभार, आता सगळं ठीक आहे." रजनीकांत यांच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय अभिनेता सुपरस्टार रजनीकांत यांचं अकाऊंट काल हॅक केलं होतं. याबाबत पोलिसांत औपचारिक तक्रार दाखल केलेली नव्हती.