किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929मध्ये झाला होता. त्यांचं मूळ नाव आभास कुमार गांगुली होतं. गाण्यासोबतच किशोर कुमार यांनी अभिनयातही आपला ठसा उमटवला. 'शिकारी' सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र बॉक्स ऑफिसवर त्यांचे काहीच चित्रपट गाजले. पण 1960च्या दशकात ते यशाच्या शिखरावर पोहोचले. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांचा आवाज ते बनले.
किशोर कुमार यांनी चार लग्न केली. रुमा गुहा ठाकुरता या त्यांच्या पहिल्या पत्नी. त्यांचं लग्न आठ वर्ष टिकलं. त्यानंतर सौंदर्यवती मधुबाला यांच्याशी त्यांनी विवाह केला. विशेष म्हणजे मधुबाला आजारी असतानाही किशोरदांनी त्यांच्याशी विवाह केला. त्यानंतर योगिता बालींशी झालेलं लग्न अवघी दोन वर्षच टिकलं. तर लीना चंदावरकर या त्यांच्या चौथ्या पत्नी.
किशोर कुमार यांचा मृत्यू 13 ऑक्टोबर 1987 रोजी झाला आणि त्यांचा सदाबहार आवाज आजही रसिकांच्या मनात कायम आहे.
किशोरदांच्या शेवटच्या गाण्याला 15.6 लाख रुपये
किशोर कुमार म्हटलं की खास किशोर स्टाईलमधली असंख्य गाणी ओठांवर यायला लागतात. किशोर या नावाची आणि त्यांच्या गाण्यांची क्रेझ जराही कमी झालेली नाही.
त्यामुळेच किशोरदांनी रेकॉर्ड केलेल्या शेवटच्या गाण्याला तब्बल 15.6 लाख रुपये एवढी किंमत मिळाली होते. ऑसियान या संस्थेमार्फत 2012 हा लिलाव करण्यात आला होता. या लिलावामध्ये जुन्या जमान्यातील अनेक तारेतारकांच्या वस्तूंचाही समावेश होता.
किशोर कुमार यांनी त्यांच्या मृत्यूच्या तीनच दिवस आधी, ऑक्टोबर 1987 मध्ये एक गाणं रेकॉर्ड केलं होतं. ज्या चित्रपटासाठी त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं, त्या चित्रपटाबद्दल फारशी माहिती नाही. मात्र या गाण्याच्या रेकॉर्डला भरमसाठ किंमत मिळाली आहे.
ओसियानला या रेकॉर्डला 6.25 लाख रुपये ते दहा लाख रुपयांपर्यंत किंमत येईल, असा ऑसियानचा अंदाज होता. मात्र आलेली किंमत त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त होती.
किशोर कुमार यांची सदाबहार गाणी, जी हिट होती, हिट राहतील