Tarak mehta Ulta Chashma Actress Divorce :   छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणााऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak mehta Ulta Chashma ) या मालिकेत काम केलेल्या  अभिनेत्रीचा काडीमोड होणार आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये बावरी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या नवीना बोलेचा घटस्फोट होणार आहे. सात वर्षांपूर्वी ती विवाहबद्ध झाली होती. 


'इश्कबाज' फेम नवीना बोले ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'इश्कबाज' या मालिकेतील 'टिया' या व्यक्तिरेखेने नवीना बोले ही चांगलीच लोकप्रिय झाली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'बावरी' या व्यक्तिरेखेनेही नवीना प्रसिद्ध झाली होती. नवीना 'मिले जब हम तुम' आणि 'जीनी और जुजू' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली. नवीनाच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांचे सात वर्षे जुने वैवाहिक जीवन धोक्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. ती पती जीत करणपासून वेगळी झाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान स्वत: नवीनाने याचा खुलासा केला आहे.


सात वर्षांचा संसार मोडला... 


नवीना बोलेने वर्ष 2017 मध्ये अभिनेता-निर्माता जीत करणसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर 2019 मध्ये नवीनने किमायराला एक लाडकी मुलगी जन्म दिला. त्याचवेळी आता त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नवीनाने अलीकडेच 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत पती जीत करणपासून वेगळे झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिने सांगितले की,'ती तीन महिन्यांपूर्वी पती जीतपासून विभक्त झाली होती. आता आम्ही लवकरच कायदेशीर प्रक्रिया सुरू करू आणि अधिकृत घटस्फोट घेऊ. विभक्त झाल्यानंतरही, जीत आणि मी आमच्या 5 वर्षांच्या मुलीला एकत्र वाढवू आणि जीत आठवड्यातून दोन दिवस आपल्या मुलीसोबत घालवेल. आम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहोत, असेही तिने सांगितले. 




लग्न मोडण्याचे कारण काय?


नवीना बोलेने वेगळं होण्याचे कारण स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र, तिने  सांगितले की, सुरुवातीला आमच्या लग्नात सर्वकाही चांगले चालले होते, परंतु नंतर सर्वकाही बदलले. आम्ही आमच्या मुलीसाठी आमचे लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काहीही झाले नाही. त्यानंतर आम्ही एकमेकांशी शांतपणे बोललो आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री म्हणाली की ही एक कौटुंबिक बाब आहे आणि सध्या दोघांमध्ये तणाव आहे आणि त्यामुळे तिला या प्रकरणावर थोडी गोपनीयता हवी आहे.