Taapsee Pannu Wedding :  अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आलीये. सोशल मीडियावर तापसीच्या लग्नाचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झालाय. तापसीने तिचा बॉयफ्रेंड माथियास बोसोबत लग्नगाठ बांधली. परंतु अद्यापही तापसीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. पण नुकतच तिची एक मुलाखत समोर आलीये. 


Elle ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तापसीने यावर भाष्य केलं आहे. तापसी 23 मार्च 2024 रोजी प्रियकर मॅथियास बो (Mathias Boe) याच्यासोबत लग्नबंधनात अडकली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याचे फोटो किंवा व्हिडीओ समोर आले नव्हते.आता कोणाला न सांगता लपूनछपून लग्न केलेल्या तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu Wedding Video) लग्नाचा व्हिडीओ लीक झाला आहे. 


आता माझ आयुष्य आनंदात जगतेय - तापसी पन्नू


तापसीने या मुलाखतीमध्ये म्हटलं की, आता कामाशिवाय मी माझ आयुष्य आनंदात जगतेय. आताच्या घडीला माझी प्रोफेशनल चॉईस हा माझ्या वेळवर अवलंबून आहे. मी कोणाताही प्रोजेक्ट साईन करताना त्याच्या माझ्या वेळेवर तर परिणाम होणार नाही ना याची मी जास्त काळजी घेते. कारण आता कामाशिवायही मला माझ आयुष्य एन्जॉय करायचं आहे. 


तापसी पन्नू 'या' ठिकाणी अडकली लग्नबंधनात


मीडिया रिपोर्टनुसार, तापसी पन्नू आणि मॅथियास  बो उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. शाही थाटात लग्न करण्यापेक्षा कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत लग्न करणं तिने पसंत केलं आहे. 20 ते 23 मार्च दरम्यान त्यांचा लग्नसोहळा सुरू होता. तापसी पन्नू आणि मॅथियास गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 23 मार्च 2024 रोजी ते लग्नबंधनात अडकले. 


तापसी पन्नू आणि मॅथियास यांची पहिली भेट 2013 मधअये इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटनादरम्यान झाली होती. दोघांनी कधी त्यांचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलं नाही. तापसी पन्नूने अनेकदा मॅथियाससोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. लग्नानंतर तापसीने धुळवडीचा सण साजरा केला. 






ही बातमी वाचा : 


Taapsee Pannu Wedding Video : कोणाला न सांगता लपूनछपून लग्न केलेल्या तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ लीक झालाच