Kannada actress Swati Sathish Root Canal Surgery : कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश (Swati Sathish) सध्या चर्चेत आहे. सध्या स्वातीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत स्वातीच्या चेहऱ्यावर सूज दिसत आहे. स्वातीने 29 मे रोजी रूट कॅनल सर्जरी (Root Canal Surgery) केली होती. आता स्वातीने चुकीची सर्जरी केल्याचा आरोप डॉक्टरांवर केला आहे.
स्वातीने एका मुलाखतीत म्हटले आहे,"माझी प्रकृती सुधारत असली तरी माझ्या चेहऱ्यावर सूज कायम आहे. मला चांगले हसतादेखील येत नाही. आता रूट कॅनल सर्जरीला 23 दिवस झाले असले तरी माझा चेहरा नीट झालेला नाही. चेहरा पूर्वीसारखा होण्यासाठी दोन आठवडे ते एक महिन्याचा कालावधी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. माझी रूट कॅनल सर्जरी चुकीच्या पद्धतीने झाली आहे".
स्वाती पुढे म्हणाली, डॉक्टर मयूरीने चुकीच्या पद्धतीने माझी रूट कॅनल सर्जरी केली आहे. चेहऱ्यावर सूज आल्यानंतर मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेले तेव्हा मला यासंदर्भात माहिती मिळाली. सर्जरी दरम्यान मला सोडियम हाइपोक्लोराइटचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर एनेस्थीशियाचे इंजेक्शन देण्यात आले. दुसऱ्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आधी एनेस्थीशियाचे इंजेक्शन दिले जाते त्यानंतर सोडियम हाइपोक्लोराइटचे इंजेक्शन दिले जाते.
दुसरीकडे डॉक्टर मयूरी म्हणाल्या,"रूट कॅनल सर्जरी मी योग्य पद्धतीनेच केली आहे. मी आधी एनेस्थीशियाचे इंजेक्शन दिले होते. त्यानंतर सोडियम हाइपोक्लोराइटचे इंजेक्शन दिले. पण सोडियम हाइपोक्लोराइट इंजेक्शनचा स्वातीला साइड इफेक्ट झाला आहे. त्यामुळे तिचा चेहरा सुजला आहे".
सर्जरीनंतर चेहरा बिघडल्यानं स्वातीनं घराबाहेर पडणं बंद केलं आहे. डॉक्टरांमुळे तिचा चेहरा खराब झाला असल्याचं स्वातीनं सांगितलं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी भूल देण्याऐवजी सॅलिसिलिक अॅसिड दिलं, असा दावा स्वातीनं केला. '6 To 6' , FIR या मालिकांमध्ये स्वातीनं काम केलं आहे. सध्या स्वातीची ट्रीटमेंट दुसऱ्या डॉक्टरांकडे सुरू आहे.
संबंधित बातम्या