Sushmita Sen: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सुष्मिता सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट शेअर करते. सुष्मिताने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या सुष्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेन 'मणिपूर संगाई फेस्टिव्हल 2022' च्या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी इंफाळ येथे पोहोचली. या समारंभात डिझायनर रॉबर्ट नोरेमसाठी रॅम्प वॉकही केला. या कार्यक्रमानंतर अनेक चाहत्यांनी सुष्मिताची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली.
सुष्मितानं शेअर केला व्हिडीओ:
सुष्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक हे सुष्मिताची झलक पाहण्यासाठी थांबलेले दिसत आहेत. सुष्मिता कार्यक्रमामधून आल्यावर अनेकांनी फोटो काढले. व्हिडीओ शेअर करुन सुष्मितानं कॅप्शन दिलं, 'जवळपास 1000 लोक होते ज्यांना शोमध्ये जाता आलं नाही. बरेच जण बाहेर थांबले होते. हे कळाल्यावर रॉबर्ट नोरेम आणि मी ठरवलं की आपण ओपन कारमधून या ठिकाणाहून बाहेर पडू. हा क्षण माझ्या कायम लक्षात राहिल.'
पाहा व्हिडीओ:
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
सुष्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं पोस्ट केली, 'मणिपूरला तू पुन्हा भेट दे. तू तरुणांना प्रेरित करतेस. खरोखर तू एक नम्र व्यक्ती आहेस.' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'सुष्मिता ही अनेकांची प्रेरणा आहे.'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: