Sushant Singh Rajput Biopic : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. आता सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याची चर्चा आहे. सिने-निर्माता संदीप सिंह (Sandeep Singh) या सिनेमाची निर्मिती करू शकतो. 


सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. आत्महत्येच्या तीन वर्षांनंतरही चाहत्यांमध्ये त्याची चांगलीच क्रेझ आहे. सुशांतचे सर्वच सिनेमे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. या सिनेमांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. अभिनेत्याचा खास मित्र संदीप सिंहने नुकतचं एका सिनमाच्या प्रमोशनदरम्यान खुलासा केला आहे की,"सुशांतचं आयुष्य लवकरच रुपेरी पडद्यावर येईल". 


सुशांत सिंह राजपूतवर सिनेमा येणार? 


सुशांत सिंह राजपूतवर सिनेमा येणार का? असा प्रश्न संदीपला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत संदीप म्हणाला,"अजिबात नाही. मला वाटतं सुशांत सिंह राजपूत हा विषय लोकांनी शांततेत घ्यायला हवा. मी त्याच्या आयुष्यावर कधीही सिनेमा बनवणार नाही. सुशांतच्या आयुष्यावर मी सिनेमा बनवावा यासाठी मला चांगले पैसेदेखील देण्यात येत आहेत. सुशांतच्या आयुष्यावर सिनेमा आला तर तिच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाच या गोष्टीचा त्रास होणार आहे". 






संदीप पुढे म्हणाला,"2024 हे वर्ष माझं कमबॅक असणार आहे". सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी मुंबईतील राहत्या घरी बांद्रा येथे आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सध्या सीबीआय याप्रकरणाची चौकशी करत आहे". सुशांतच्या आयुष्यावर सिनेमा येणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.


सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेला अश्रू अनावर


सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेला अश्रू अनावर झाले होते. काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने यासंदर्भात खुलासा केला आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे शांत का होती? 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा खुलासा