Sushant Singh Rajput Ankita Lokhande Breakup Reason : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण सर्वात मोठा धक्का बसला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला म्हणजेच अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande).
सुशांत आणि अंकिताची पहिली भेट कुठे झाली? (Sushant Singh Rajput Ankita Lokhande First Meet)
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या लव्हस्टोरीची आजही चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. सुशांत आणि अंकिताची पहिली भेट 2009 साली 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि अंकिताची चांगली मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे तब्बल सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम असून त्यांना लग्नदेखील करायचं होतं. सुशांतने अंकिताला 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या सेटवर लग्नाची मागणी घातली होती आणि अंकितानेदेखील होकार दिला होता. पण सुशांतने सिनेमांत काम करायला सुरुवात केली आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला.
'त्या' सेल्फीमुळे तुटलं सहा वर्षांचं नातं
सुशांत सिंह राजपूत आणि परिणीती चोप्रा 'शुद्ध देसी रोमांस' या सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमात ते लिपलॉक करतानादेखील दिसले होते. त्यामुळे अंकिता खूप हैराण झाली होती. 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान परिणीती आणि सुशांत अनेकदा एकमेकांना भेटत असे. त्यांची भेटणं अंकिताला आवडत नव्हते. तसेच सुशांत आणि परिणीतीच्या लिपलॉकमुळे अंकिता खूप नाराज होती. यामुळे अंकिताने सुशांतच्या कानाखालीदेखील मारली होती.
परिणीती लवकरच राघव चड्ढासोबत अडकणार लग्नबंधनात
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 13 मे 2023 रोजी दिल्लीत त्यांचा साखरपुडा पार पडला. परिणीती आणि राघव ऑक्टोबर महिन्यात लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. परिणीती आणि राघव यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या