मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज अँगलमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ने सप्टेंबर 2020 मध्ये अभिनेत्री सारा अली खानची चौकशी केली होती. 'केदारनाथ' चित्रपटाच्या वेळी सारा अली खान सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान एनसीबीसमोर तिचं नाव घेतलं होतं. आता  NCB ला दिलेल्या जबाब सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे, ज्यात तिने सारावर गंभीर आरोप केले आहेत. रियाचा हा जबाबाचा तपास यंत्रणेने आपल्या आरोपपत्रात समावेश केला आहे.


अनेक वेळा रियाने सारासोबत ड्रग्जचं सेवन केलं
रियाने आपल्या जबाबात म्हटलं आहे की, 'आमच्यात ड्रग्जशी संबंधित बातचीत झाली होती, ज्यात ती (सारा) हँगओवरवरचा उपाय सांगत होती. ती आईस्क्रीम आणि गांज्याबाबत बोलत होती, जे ती स्वत: वापरत असे. तसंच वेदना कमी कमी करण्यासाठी मलाही ऑफर करत होती. ही बातचीत मेसेजद्वारे झाली होती, वैयक्तिकरित्या नाही. सारा रोल्ड डूबीज घेत असे. डूबीज हे गांजाचे सिगरेट (जॉईंट्स) असतात. काही वेळा मी देखील सारासोबत हे घेतलं होतं. ती मला डूबीज उपलब्ध करुन देत असे.


NCB तरीही साराला समन पाठवणार नाही
रिया चक्रवर्तीच्या लेखी जबाबानंतरही NCB सारा अली खानला समन पाठवणार नाही. तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "एखाद्याला चौकशीसाठी बोलावण्यासाठी तुमच्याकडे त्याच्याविरोधात सबळ पुरावे असावे लागतात. आम्ही पुराव्याच्या आधारावर काम करतो."


साराने एनसीबीला काय सांगितलं होतं
सप्टेंबर 2020 मध्ये झालेल्या चौकशीत सारा अली खानने एनसीबीसमोर मान्य केलं होतं की, "2018 मध्ये ती सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती." 'केदारनाथ'च्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलंल. शिवाय चित्रीकरण सुरु असतानाच ती सुशांतच्या केप्री हाऊस इथल्या घरात त्याच्यासोबत राहायलाही गेली होती. ती सुशांतसोबत पाच दिवसांसाठी थायलंडच्या कोह समुई आयलंडवरही गेली होती, जिथे पार्टी केली होती.


ड्रग्जचं सेवन केलं नाही, साराचा एनसीबीकडे जबाब
केदारनाथच्या चित्रीकरणादरम्यान सुशांत ड्रग्ज घेत असे, असंही साराने कबूल केलं. "मी त्याच्यासोबत पार्टीला जात होते, पण स्वत: कधीही ड्रग्जचं सेवन केलं नाही," असं तिने एनसीबीला सांगितलं. परंतु सुशांतने 'केदारनाथ'च्या चित्रीकरणादरम्यान ड्रग्ज सेवन करण्यास सुरुवात केली होती की तो आधीपासूनच ड्रग्ज घेत होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.