Sunny Movie : हेमंत ढोमेचा (Hemant Dhome) 'सनी' (sunny) हा सिनेमा येत्या 19 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) त्याला काय ऐकून भारी वाटलं ते सांगितलं आहे. चिन्मय म्हणाला,"मी तीन वर्ष एनएसडीत होतो. तेव्हा पहिल्या वर्षी गणेशोत्सवात विनय सरांचं 'सुपरहिट नंबर वन' हे नाटक दिल्लीत आलं होतं". 

Continues below advertisement

चिन्मय पुढे म्हणाला,"खूप कष्टाने मी विनय सरांच्या नाटकाला गेलो होतो. पडदा उघडला नाटक सुरू झालं आणि स्क्रिनवर विनय आपटे दिसले. ते म्हणाले,दिल्लीतल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आणि मला रडायला यायला लागलं. दिल्लीत विनय सरांच्या तोंडून मराठी ऐकायला मिळालं आणि ते ऐकून मला खूप भारी वाटलं". तर दुसरीकडे ललित प्रभाकरने मित्रांवर गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणाला,"माझ्या मित्रांचा असा आरोप आहे की, मी त्यांचं तारुण्य मारलं. 

हेमंत ढोमेचा टायटॅनिक कसा झाला?

हेमंत ढोमे म्हणाला,"माझं कॉलेज संपल्यानंतर मला एक मुलगी आवडायची. मी खास तिच्यासाठी कविता लिहिली होती. आमचं सगळं जमून येणार तेवढ्यात मी तिला म्हणालो, तू अगदी केट विन्सलेटसारखी दिसते. कारण तिचे डोळे तसे होते. त्यानंतर तिला थेट टायटॅनिक आठवलं. माझ्या एका चुकीने माझाच गेम झाला".  

Continues below advertisement

क्षिती जोगला लांब गेल्यावर काय आठवतं?

क्षिती जोग म्हणाली,"मला नाटकाचे दौरे आठवतात. दौऱ्यावर गेल्यावर आजीच्या हातचं मेतकूट, वरण-भात आठवतं. तसेच लंडनला शूटिंग करताना खूप मजा येते पण त्यावेळी माशाचं कालवण आणि भात, आईच्या हातचं जेवन आणि त्रास देणारे हक्काचे मित्र आठवतात. 

प्रेक्षकांच्या भेटीसाठी 'सनी' सज्ज!

घरापासून लांब गेलेल्या ललित प्रभाकराला म्हणजेच 'सनी'ला क्षणोक्षणी घरच्यांची, त्याच्या मित्रांची आठवण येत आहे. ज्या गोष्टी घरी असताना त्याला क्षुल्लक वाटत होत्या, त्याचे महत्व त्याला घरापासून लांब गेल्यावर उलगडत आहे. 'होमसिक' बनलेल्या 'सनी'चा एक भावनिक प्रवास 'सनी' या सिनेमात दाखवण्यात आला आहे. घरापासून लांब राहणाऱ्या आणि आपल्या मातीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकाला हा सिनेमा आवडेल. 'नाचणार भाई' आणि 'रात ही' ही सिनेमातील दोन गाणी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 

संबंधित बातम्या

Sunny Movie: ‘सनी’ चित्रपटात चिन्मय मांडलेकर साकारणार 'ही' भूमिका; लूक पाहिलात?