मूळ चिपळूणचा असलेला संतोष म्हणजेच अभिषेक देशमुख इंग्लंडला शिकायला गेला असून तो 'सनी'चा खूप जवळचा मित्र दिसत आहे. मैत्रीत सनीला मदत करणारा, त्याच्यावर जीव लावणारा असा हा मित्र सनीला प्रत्येक क्षणी मदत करत आहे. गोंधळलेल्या सनीला वेळोवेळी योग्य दिशा दाखवणाऱ्या संतोषची म्हणजेच अभिषेकची यात महत्वाची भूमिका आहे. तर अमेय 'सनी'चा पारगावचा जिगरी मित्र असून मस्तीमध्ये त्याला साथ देणारा दिसत आहे. तर पॉऊलोही 'सनी'च्या आयुष्यात धमाल आणणार असल्याचे दिसतेय. प्रोमोवरून यांची ही भन्नाट मैत्री चित्रपटात रंगत आणणार हे नक्की. या चित्रपटात ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पाहा टीझर:
क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
काही दिवसांपूर्वी सनी चित्रपटातील 'नाचणार भाई' हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''जेव्हा वेगवेगळ्या देशातील, भागातील मित्र शिक्षणानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने एकत्र येतात तेव्हा हे मित्रच त्यांचा परिवार बनतात आणि मग आनंदाचा प्रत्येक क्षण ते त्यांच्यासोबतच साजरे करतात. '
इरावती कर्णिक लिखित हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' या चित्रपटाचे अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Sunny Movie: ‘सनी’ चित्रपटात चिन्मय मांडलेकर साकारणार 'ही' भूमिका; लूक पाहिलात?