सनी लिओनच्या आयुष्यावर सिनेमा, सनीच स्वतःच्या भूमिकेत
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 07:20 AM (IST)
मुंबई : पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी आलेली स्टार सनी लिओनवर लवकरच एक चित्रपट येणार आहे. सनीच्या आयुष्यावरील या चित्रपटात खुद्द सनी लिओनच स्वतःची भूमिका साकारणार आहे. तेरे बिन लादेन सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारा अभिषेक शर्मा या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची जबाबदारी स्वीकारणार आहे. ग्लॅमर इंडस्ट्री, पॉर्न फिल्म आणि पती डॅनिएल वेबरसोबतची प्रेमकहाणी असा प्रवास या सिनेमात मांडण्यात येणार आहे. कॅनडाचे फोटो जर्नलिस्ट दिलीप मेहता यांनीही सनीच्या आयुष्यावर आधारित 'मोस्टली सनी पार्टली क्लाऊडी' ही डॉक्युमेंट्री केली होती. सन्डान्स फिल्म फेस्टिव्हल 2016 मध्ये ही फिल्म दाखवली होती.