मुंबई : हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदारो’ सिनेमा कोणतीही काटछाट न करता संमत करण्यात आला. मात्र, अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ सिनेमातील दोन शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत, दोन्ही शब्द हटवण्याची सूचना दिली.

 

‘रुस्तम’ सिनेमातील एका सीनमध्ये अक्षय आपल्या पत्नीला ‘बिच’ म्हणतो आणि दुसऱ्या एका सीनमध्ये ‘बास्टर्ड’ शब्दाचा वापर झाला आहे. त्यामुळे या दोन्ही शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यानंतर ‘रुस्तम’च्या निर्मात्यांनी शब्द हटवले आहेत. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला UA सर्टिफिकेट देण्यात आलं आहे.

 

‘रुस्तम’ सिनेमाशी संबंधित लोकांनी सांगितले, सेन्सॉरच्या सूचनेमुळे आश्चर्य वाटतं आहे. कारण हे दोन्ही शब्द बहुतेक सिनेमांमध्ये ऐकायला मिळतात. मात्र, आता वादात पडण्याच्या मूडमध्ये आम्ही नाही. त्यामुळे दोन्ही शब्द हटवले आहेत. शिवाय, अक्षय कुमारचे सिनेमे पाहण्यासाठी लोक सहकुटुंब येतात. त्यामुळे शब्द हटवून खबरदारी घेतली आहे.

 

अक्षय कुमारसोबत इलायाना डीक्रूज, ईशा गुप्ता हे तिघे या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून, 12 ऑगस्टला सिनेमा रिलीज होणार आहे.