सनी लिऑनसोबत अरबाज खान रोमान्स करणार
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2016 10:30 AM (IST)
मुंबई: अभिनेत्री सनी लिऑन आणि अरबाज खान आगामी रोमांटिक सिनेमा 'तेरा इंतजार'मध्ये पहिल्यादाच सोबत दिसणार आहेत. कच्छच्या रणमध्ये अरबाजसोबत सनी लिऑन ऑगस्टपासून शूटिंग सुरु करणार आहे. ती रिअॅलिटी शो ‘स्पिलट्सविला 9’ मध्येही दिसणार आहे. खुद्द सनीनेच या अरबाजसोबत काम करणार असल्याचं म्हटलं आहे. "मी अरबाज सोबत काम करायला फारच उत्साहित आहे." असं सनी म्हणाली. राजीव वालिया दिग्दर्शित तेरा इंतजार या सिनेमाचं शूटींग कच्छमध्ये असणार आहे. हे शूटिंग 25 दिवस चालणार आहे. याशिवाय विदेशातही या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. अरबाज खानने तर सिनेमाला आधीच होकार दिला होता. तर सनी लिऑननेही सिनेमाची पटकथा ऐकल्यानंतर तात्काळ होकार दिला.