Sunny Leone : छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवणारी सनी लिओनी (Sunny Leone) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता ती 'स्प्लिट्सविला 15' हा कार्यक्रम होस्ट करताना दिसणार आहे. पण त्याआधीच तिने स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. सनी लिओनीच्या नव्या हॉटेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


सनी लिओनीचं नवं हॉटेल


सनी लिओनीच्या नव्या हॉटेलचं नाव 'चिका लोका' असं आहे. गूगलनुसार या शब्दाचा अर्थ वेडी मुलगी असा होतो. नोए़डा येथील सेक्टर 129 मध्ये तिने हे हॉटेल सुरू केलं आहे. सनीच्या हॉटेलमध्ये जायचं असेल तर चाहते 9990082799 या नंबरवर संपर्क साधू शकतात. 


सनीने बनवला पिज्जा


सनीला अभिनयासह स्वयंपाकाची आवड आहे. आता नव्या हॉटेलमध्ये तिने पिज्जा बनवला आहे. पिज्जा बनवतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सनीने आपल्या हॉटेलची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.






कोट्यवधींची मालकीण सनी लिओनी (Sunny Leone Net Worth)


सनी लिओनीची एकूण कमाई 98 कोटींच्या आसपास आहे. वर्षाला ती दोन कोटी रुपये कमावते. सिनेमांसह जाहिराती आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ती चांगलीच कमाई करते. सिनेमांसह तिला गाड्यांचीदेखील आवड आहे. सनीकडे ऑडी A5 आणि बीएमडब्लू 7 सीरिजची गाडी आहे.  लॉस एंडलिसमध्ये तिचा एक बंगला असून मुंबईतदेखील घर आहे.


सनी लिओनीबद्दल जाणून घ्या (Who is Sunny Leone)


सनी लिओनी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. सनीने 2012 मध्ये 'जिस्म 2' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या सिनेमात ती रणदीप हुड्डा आणि अरुणोदय सिंहसोबत स्क्रीन शेअर करताना दिसून आली होती . सनीने जॅकपॉट, शूटआऊट अॅट वदाला, रागिनी एसएसएस 2, हेट स्टोरी 2, एक पहेली लीला, कुछ कुछ लोचा है, मस्तीजादे,  वन नाईट स्टँड, अर्जुन पटियालासारख्या सिनेमांत तिने काम केलं आहे. 


सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 54 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बोल्ड अभिनेत्री म्हणून सनी लोकप्रिय आहे. 'एडल्ट' या सिनेमाच्या माध्यमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अल्पावधीतच तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनी लिओनीने अभिनयाबरोबर नृत्यशैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.


संबंधित बातम्या


Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती