सनी लिओनी लातूरमध्ये, पत्रकाराच्या 'बोल्ड' प्रश्नानंतर धक्काबुक्की
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 31 May 2017 03:05 PM (IST)
लातूर: अभिनेत्री सनी लिओनीने आज लातूरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र सनी येणार असल्यामुळे आधीच तापलेल्या लातूरमधील वातावरण आणखी हॉट झालं. पण सनीच्या कार्यक्रमात धक्काबुक्कीचा प्रकार झाला. सनीच्या हस्ते एका फिटनेस क्लबचं उद्घाटन झालं. संध्याकाळी होणारा हा कार्यक्रम अचानकपणे दुपारीच उरकण्यात आला. त्यानंतर सनीने पत्रकारांशी संवाद साधला. एका पत्रकाराने सनीला "आपण बोल्ड चित्रपटात काम करता याबाबत आपणास वाईट वाटते का"? असा प्रश्न विचारला. त्यावर आयोजकांनी प्रश्नावर आक्षेप घेत बाचाबाची केली. ही बाचाबाची पुढे धक्का-बुक्कीपर्यंत पोहोचली. पण सनी लिओनीने मध्यस्थी करत, इट्स ओके म्हणत आयोजकांना आवरलं. इतकंच नाही तर पुढे प्रकरण चिघळणार नाही, याची काळजीही घेतली. या सर्व प्रकाराननंतर आयोजकांनी सारवासारव करत त्याच ठिकाणी माफीनामाही सादर केला.