सनी लिओनीची वेब सीरिज कायद्याच्या कचाट्यात?
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2018 12:23 PM (IST)
'करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' ही वेब सीरिज 16 जुलैपासून Z5अॅपवर पाहायला मिळणार आहे.
मुंबई : सनी लिओनीचा पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सनीच्या आयुष्यावर ही 'करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' वेब सीरिज आधारित आहे. काही दिवसांपूर्वीच याचा ट्रेलर रिलीज झाला होता. ट्रेलर लोकांच्या पसंतीस उतरला आहे. पण ही वेब सीरिज आता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. सनीच्या बायोपिकवर संकट सनी लिओनीच्या आयुष्यावर बनणाऱ्या या वेब सीरिजवर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रवक्ते दिलजीत सिंह बेदी यांनी आक्षेप नोंदवला आहे. सिनेमात 'करनजीत कौर' या शब्दाच्या वापरावर नाराजी व्यक्ती केली आहे. सनी लिओनीने आपला धर्म बदलला आहे. तरीही ती आपल्या सिनेमात 'कौर' शब्द वापरत आहे. या शब्दाचा वापर करुन ती शिखांच्या भावनांशी खेळत आहे, असं दिलजीत सिंह बेदी म्हणाले. तसंच याविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीतर्फे सांगण्यात आलं आहे. 16 जुलैपासून Z5 अॅपवर या वेब सीरिजमध्ये सनी लिओनीच स्वत:ची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' ही वेब सीरिज 16 जुलैपासून Z5अॅपवर पाहायला मिळणार आहे.