अभिनेता सुनील शेट्टी ट्विटरवरून चाहत्यांच्या भेटीला
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2016 05:47 AM (IST)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या चाहत्यांसाठी ट्विटर अकाऊंट काढलं आहे. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर सिनेजगतात पुनरागमन करणारा सुनील शेट्टी आता ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहे. "ट्विटर हा आपला आवाज आहे आणि चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम माध्यमांपैकी एक आहे. मी दोन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करत आहे." असं या 55 वर्षीय अभिनेत्यानं सांगितलं आहे. https://twitter.com/SunielVShetty/status/764402617418211328 अभिनेता हृतिक रोशनच्या 2014 मधील बँग बँगचा सिक्वेल असलेल्या रिलोडेडमधून सुनील पुन्हा बॉलिवूडमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडीस प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.