'बेबी को बेस पसंद है', सुलतानचं पहिलं गाणं रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2016 03:49 PM (IST)
नवी दिल्लीः बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानच्या आगामी सुलतान सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. 'बेबी को बेस पसंद है' असं या गाण्याचं टायटल असून सलमान अनुष्काची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळत आहे. या गाण्याला विशाल डडलानी, शामली खोलगडे, इशिता आणि बादशाह यांनी आवाज दिला आहे. सुलतान सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जाफर यांनी केलं आहे. सलमान या सिनेमात पहिलवानाच्या हटके भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या सिनेमाचं ट्रेलर रिलीज करण्यात आलं होतं. या ट्रेलरने चाहत्यांना वेड लावलं आहे. दरम्यान या गाण्यात सलमान आणि अनुष्का जबरदस्त थिरकलेले दिसत आहेत. हे गाणं पाहून चाहत्यांची सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचणार आहे. पाहा गाण्याचा व्हिडीओः