सलमानच्या 'सुलतान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, विक्रमी कमाई!
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 02:18 AM (IST)
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या 'सुलतान' सिनेमानं अवघ्या 12 दिवसांमध्ये तब्बल 500 कोटींची विक्रमी कमाई केली आहे. याबाबतची अधिकृत माहिती यश राज फिल्मकडून ट्विटरद्वारे देण्यात आली आहे. ‘सुलतान’ चित्रपटाची तिकीट बारीवर विक्रमी घोडदौड अजूनही सुरु आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात सुलतान याआधीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘सुलतान’ने ४० कोटींचा गल्ला जमवला होता. सुलतान हा सिनेमा अली अब्बास जाफर यांनी दिग्दर्शित केला आहे. सलमान खानने सुलतान पैलवानाची भूमिका साकारली आहे. तर अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत आहे. संबंधित बातम्या : पाकिस्तानमध्येही ‘सुलतान’चा धुमाकूळ, सर्व रेकॉर्ड मोडित ‘सुलतान’च नव्हे, सलमानच्या या 9 सिनेमांची 100 कोटींची कमाई सुलतानच्या सिक्वेलच्या चर्चेवर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण सलमानचा ‘सुलतान’ जबराट, ‘पीके’चा रेकॉर्ड मोडणार : आमीर खान फोटो – ‘सुलतान’ची रेकॉर्डब्रेक कमाई ‘सुलतान’चे दहा सुपरहिट डायलॉग सुलतान का पाहावा? पहिल्याच दिवशी ‘सुलतान’ची रेकॉर्डब्रेक कमाई