दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 'सुलतान'ने 37.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर बुधवारी, ‘सुलतान’ 36.54 कोटींसह यंदाच्या वर्षात पहिल्या दिवसात सर्वात मोठी कमाई सिनेमा ठरला होता.
या सिनेमाची दोन दिवसातील कमाई 73.74 कोटी रुपये झाली आहे.
सुलतान हा सिनेमा अली अब्बास जाफर यांनी दिग्दर्शित केला आहे. सलमान खानने सुलतान पैलवानाची भूमिका साकारली आहे. तर अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत आहे.