Kiran Mane Post On Shah Rukh Khan : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. आता शाहरुख खानबद्दल (Shah Rukh Khan) त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. शाहरुख कधी कुणाला 'नमस्कार' करत नाही 'सलाम' करतो, असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.


शाहरुख खानचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवत आहे. शाहरुखचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेते किरण मानेदेखील (Kiran Mane) शाहरुखचे जबरा फॅन आहेत. अनेकदा ते त्यांच्या लाडक्या एसआरकेबद्दल (SRK) पोस्ट शेअर करत असतात. आतादेखील त्यांनी किंग खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


किरण मानेंनी शेअर केला शाहरुखचा 'तो' व्हिडीओ (Kiran Mane Shared Shah Rukh Khan Video)


किरण माने यांनी सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किंग खानसोबत मोहनलाल आणि काही अभिनेतेही दिसत आहेत. एसआरके मंचावर येताना सर्वांना नमस्कार करताना दिसत आहे. त्यानंतर पुढे तो मोहनलालला झुकून नमस्कार करतो. पुढे किंग खानच्या या कृतीने भारावून जात मोहनलाल त्याला मिठी मारतो. 






किरण माने यांनी शाहरुखचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि कुठं नम्रपणे झुकायचं, हे ज्याला कळलं...त्यानं जग जिंकलं. परवा एका सी ग्रेड सिनेमा दिग्दर्शकाचा इंटरव्ह्यू पाहिला. ज्यात तो सांगत होता शाहरुख कधी कुणाला 'नमस्कार' करत नाही,'सलाम' करतो...आणि हा प्रसंग डोळ्यापुढे आला".


किरण मानेंनी पुढे लिहिलं आहे,"आजकाल असत्य पेरून नफरत पसरवणारे सुमार दर्जाचे कलावंत मराठीतही आहेत आणि हिंदीतही. अशांनी गढुळ केलेल्या कलाक्षेत्रात शाहरुखसारखे लोक 'प्युरीफायर' आहेत. लब्यू एसआरके". शाहरुखच्या या व्हिडीओवर खरं आहे हे, खूप-खूप प्रेम किंग खान, एक नंबर कॅप्शन, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'जवान'चा बोलबाला (Jawan Box Office Collection)


किरण माने हे शाहरुख खानचे मोठे चाहते आहेत. शाहरुखचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. शाहरुखचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, भारतात रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 389.88 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या आठवड्यात 136.1 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत रिलीजच्या 17 दिवसांत या सिनेमाने भारतात 544.98 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे. तर जगभरात 938 कोटींचा गल्ला जमवला आहे.


संबंधित बातम्या


Kiran Mane: "ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आपल्या दोस्ताची बीएमडब्ल्यू..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष