Sukesh Chandrashekhar Chargesheet:  200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखरला (Sukesh Chandrashekhar) पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) देखील चौकशी केली जात आहे. आता सुकेश चंद्रशेखर विरोधात तिसरी सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या चार्जशीटमध्ये अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. या चार्जशीटनुसार, एका अभिनेत्रीनं सुकेशवर काही आरोप केले आहेत. तिने सांगितले की, "मे 2018 मध्ये सुकेश चंद्रशेखरला मी भेटले. त्यानंतर तिहार तुरुंगातून बाहेर आल्यावर पिंकी इराणीने बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून माझ्यासमोर नोटांचे बंडल फेकले आणि म्हणाली, 'ये रख, तेरी मुंह दिखाई"


चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणी उर्फ ​​एंजलने माझ्यासाठी IGI विमानतळावर स्कर्ट विकत घेतला होता आणि तो परिधान करायला सांगितला होता. कारण तिहारमधील लोकांचे लक्ष माझ्याकडे आकर्षित होईल.', असा जबाब अभिनेत्रीनं नोंदवल्याचा उल्लेखा चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. 


अभिनेत्रीनं पुढे सांगितलं, 'तुरुंगात प्रवेश केल्यानंतर मी रडू लागले, तेव्हा इराणीने मला 'काहीही होणार नाही' असे  सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेहरा दिसू नये, यासाठी पिंकीनं मला डोके खाली ठेवण्यास सांगितलं होतं.'


अभिनेत्रीनं आपल्या जबाबात म्हटलंय की, "तिला तिहारमधील एका खोलीत नेण्यात आले, ज्यामध्ये अनेक अत्याधुनिक उपकरणं होती. तेवढ्यात एक व्यक्ती खोलीत आली आणि मला सांगण्यात आलं की, तो सुकेश चंद्रशेखर आहे. त्यानं ब्रँडेड कपडे आणि घड्याळ घातलं होतं. त्यानं स्वत:ची ओळख शेखर रेड्डी अशी करून दिली. पिंकी इराणीनं मला सांगितलं की, तो सन टीव्हीचा मालक आणि जयललिता यांचा पुतण्या आहे आणि वोट हॅकिंग प्रकरणामुळे तो सध्या तुरुंगात आहे."


"मला भेटायला तिहार तुरुंगात का बोलावलंय? असं म्हणत मी सगळ्यांसमोर जोरजोरात ओरडले. त्यानं मला सांगितलं की, त्याचं माझ्यावर क्रश आहे. तो खूप दिवसांपासून माझ्या मालिका बघतोय. मी त्याला सांगितलं की, मी विवाहित आहे आणि मला दोन मुलं आहेत. तेवढ्यात सुकेश चंद्रशेखरनं मला सांगितलं की, माझ्या पतीनं मला आधीच विकलंय आणि त्याला मला वाचवायचंय." असंही अभिनेत्रीनं जबाबात बोलताना सांगितलं. 


अभिनेत्री पुढे बोलताना म्हणाली की, "चंद्रशेखरनं तिला त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या कोणालाच माहीत नाहीत. त्यानंतर तिहार तुरुंहातील खोलीतचं सुकेशनं मला किस केलं आणि मिठी मारली. मग मी तिथून निघाले. तिहारमधून बाहेर आल्यानंतर एंजल म्हणजेच पिंकीनं 2 लाख रुपये दिले. त्यापूर्वी तिहारच्या त्या खोलीत सुकेशनं त्याचं घड्याळही काढून मला दिलं होतं. 23 डिसेंबर 2018 रोजी मला आणि सुकेशनं शेवटचा कॉल केला होता.'


मुंबईत परतल्यानंतर अभिनेत्रीला ब्लॅकमेल करून 8 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अभिनेत्रीच्या दाव्यांच्या आधारे दिल्ली पोलिसांना चंद्रशेखरनंच तिला फसवल्याचा संशय आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Entertainment News Live Updates 22 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!