Stree 2 Movie Spoiler Alert : बहुप्रतिक्षीत 'स्त्री 2' (Stree 2) अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जवळपास 50 कोटींची कमाई करत चित्रपटाने सगळ्यांनाच धक्का दिला आहे. 'स्त्री 2' मध्येही काही ट्वीस्ट समोर आले आहेत. मात्र,  श्रद्धा कपूरचे (Shraddha Kapoor) चित्रपटातील नाव आणि स्त्रीचा चेहरा प्रेक्षकांसमोर आला नाही. 


श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला स्त्री 2 हा बॉक्स ऑफिसवर  धुमाकूळ घालणार असल्याचे चित्र आहे. या चित्रपटात काही ट्वीस्ट आहेत. स्त्री 2 च्या शेवटी श्रद्धा कपूर चित्रपटातील आपलं नाव विक्कीच्या (राजकुमार राव)कानात सांगते. पण, प्रेक्षकांसमोर हे नाव जाहीर होत नाही. तर, चित्रपटात स्त्रीची व्यक्तीरेखा साकारलेल्या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला नाही. पण, या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. या अभिनेत्रीने 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात भूमिका साकारली आहे. 


'स्त्री 2' मध्ये कोणी साकारलीय स्त्रीची भूमिका?


'स्त्री 'चित्रपटाच्या पहिल्या भागात 'गंदी बात' फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीने लाल घुंघट ओढलेल्या महिलेची भूमिका साकारली होती. तर, 'न्यूज 18' ने दिलेल्या वृत्तानुसार, 'स्त्री 2' च्या क्लोजिंग क्रेडिट्समध्ये स्त्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव रिव्हील करण्यात आले आहे. 'स्त्री 2' मध्ये  भूमी राजगोरने एका महिलेची भूमिका साकारली आहे.


कोण आहे भूमी राजगोर?


भूमी राजगोर ही गुजराती अभिनेत्री आहे. तिने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. गेल्या वर्षी कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात भूमी दिसली होती. या चित्रपटात भूमीने कियारा अडवाणीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. जेव्हा 'सत्यप्रेम की कथा' रिलीज झाला तेव्हा तिने  एका बॉलिवूड चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे संकेत दिले होते.


तिकिटबारीवर पहिल्या दिवशी 'स्त्री-2' चा विक्रम


14 ऑगस्टच्या रात्रीच 'स्त्री 2' रिलीज करण्यात आला होता. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 14 ऑगस्ट रोजी चित्रपटाने 8.35 कोटींची कमाई केली. आता 15 ऑगस्टच्या कलेक्शनमध्ये 'स्त्री 2'ची खरी ओपनिंग झाली. या चित्रपटाने आतापर्यंत 46 कोटींची कमाई केली. यासह, 'स्त्री 2' ने आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 54.35 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारी हाती येईपर्यंत यात वाढ झाली असण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :